माय-लेक एकत्र उत्तीर्ण - एकत्र दहावी पास आईला ५०.६० तर मुलीला ८२.४० टक्के

दहावीचा निकाल लागला आणि पिंगळे कुटुंबियांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. आनंदाचे कारण दुहेरी होते. आई रंजना पिंगळे आणि तिची मुलगी संजना या दोघीजणी यंदा दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. एरवी आई आपल्या पाल्याच्या मागे लागलेली असते की, त्याने अभ्यास करावा. परंतु इथे मात्र मुलगीच आपल्या आईला अभ्यासाला बस असे वर्षभर सांगत होती. रंजना यांना ५०.६० टक्के, तर संजनाला ८२.४० टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे आई वडाळा येथील मराठा रात्रशाळेत शिकत होती, तर संजना लोअरपरळ येथील मराठा हायस्कुलची विद्यार्थिनी होती. मुलगी जेव्हा शाळेत जायची तेव्हा आई इतर घरांचे घरकाम करायची आणि रात्री मुलगी जेव्हा घरी यायची तेव्हा आई शाळेला जायची. सुट्टीच्या दिवशी आई आणि मुलगी एकत्रच अभ्यासाला बसायचे. संजना आणि तिच्या वडिलांच्या आग्रहाखातर रंजना यांनी दहावीची परीक्षा देण्याचे ठरवले. संजनाचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. या आई आणि मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केले आहे. संजना आता सायन्स शाखेत प्रवेश घेणार असून तिला डॉक्टर व्हायचे आहे. तसेच आपल्या आईने देखील पुढे कॉलेज शिक्षण पूर्ण करावे, अशी इच्छा असल्याचे संजना सांगते.
प्रशासकीय अधिकारी प्रमोद बोरसे यांच्या कन्येला दहावीत १०० टक्के गुण.

मुंबई : निवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डाॅ. प्रमोद बोरसे यांची कन्या अबोली बोरसे हिने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळविले आहेत. दादरच्या बालमोहन विद्यामंदीर शाळेमध्ये ती शिकत होती. बोरसे यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खासगी सचिव व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केले आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली होती. अबोलीने दहावीत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पाठ्यक्रमातील परीक्षेतून तिला ९६.०२ टक्के गुण मिळाले असून कला व क्रिडा नैपुण्यातील १९ गुण मिळाल्यामुळे एकत्रित टक्केवारी १०० असल्याचे त्यांनी सांगितले.

Our Online Cources

Check out our online cources and their packages for learn new stuff.

About Zelos Infotech

Zelos Infotech Pvt. Ltd. Is Software Company, Located In Manchar, Pune District.

Zelos Infotech Office

Pasaydan Complex, Near Bus Stand,
Above Saibhushan Bakry, Manchar.
Pin. 410503.

  • Monday - Sunday, 8am to 10pm
  • +91 8888 789 402
  • zelosinfotech@gmail.com
Our location

Pasaydan Complex, Near Bus Stand,
Above Saibhushan Bakry, Manchar.
Pin. 410503.

Follow us